सरकारनामा ब्यूरो
सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांनी पुढील काळासाठी त्यांचे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
भारत सरकारने त्यांच्यासाठी विविध योजनांचा समावेश केला आहे. ज्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित आणि सोपे होईल.
60 आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) उपलब्ध करून दिली आहे.
हा एक सुरक्षित पर्याय असून, यात आकर्षक व्याजदर, हमी परतावा, निश्चित तिमाही पेआउट आणि पाच वर्षांचा कार्यकाळ ऑफर केला जातो.
प्रत्येक ज्येष्ठ नागरिक या योजनेत किमान ₹1000/- आणि जास्तीत जास्त ₹30 लाखांपर्यंत रकमेची गुंतवणूक करू शकतात.
संरक्षण दलातील सेवानिवृत्त कर्मचारी पन्नाशीनंतरच हे खाते उघडू शकतात. ही सुविधा फक्त त्यांच्यासाठीच लागू होते.
वैयक्तिक किंवा जोडीदारासह हे खाते उघडू शकतात. तसेच खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षांची मुदत संपल्यानंतर खाते बंदही केले जाऊ शकते.
ठेवीदार खाते पुढील 3 वर्षांसाठी वाढवू शकतात. इच्छेनुसार कधीही त्यांना खाते बंद करण्याची परवानगी असते.
कर आणि चलनवाढ यांच्यातील प्रत्येक बदलाची त्यांना वेळोवेळी माहितीही पुरवली जाते.
R