सरकारनामा ब्यूरो
अमेरिका म्हटलं की, सध्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा. पण ट्रम्प हे अमेरिकेतील प्रसिध्द राजकीय नेते नाहीत. दुसरचं नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. कोण आहे ती व्यक्ती वाचा...
अमेरिका जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश आहे. या देशाचा अध्यक्ष हा जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती समजली जाते.
अमेरिकेतील पत्रकारांनी राजकीय नेत्यांच्या लोकप्रियतेबाबतची माहिती गोळा केला होती. यातून अमेरिकेतील लोकप्रिय नेता कोण, हे समोर आले आहे.
निवडणूक सर्वेक्षण आणि विश्लेषणासाठी ओळखले जाणारे मॉरिस यांनी प्रसिद्ध नेत्यांच्या लोकप्रियतेबाबतची आकडेवारीच जाहीर केली आहे.
या आकडेवारीतून समोर आले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रिय नेते नसून, सीनेटर बर्नी सँडर्स हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
यामध्ये 46 टक्के लोकांनी सीनेटर बर्नी सँडर्स यांना पसंती दिली आहे,तर 39 टक्के लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली आहे.
बर्नी सँडर्स हे एक अमेरिकन राजकारणी आणि कार्यकर्ते असून व्हरमाँटमधील ज्युनियर युनायटेड स्टेट्स सीनेटर आहेत.