सरकारनामा ब्यूरो
IFS अधिकारी निरुपमा राव यांनी 1973 मध्ये UPSC त अव्वल स्थान पटकावले होते. तसेच महत्त्वाच्या कारकिर्दीत त्यांनी युनायटेड स्टेट्स आणि चीनमधील राजदूतांसह अनेक पदे भूषवली.
मीरा शंकर या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील दुसऱ्या महिला राजदूत होत्या.
मुथम्मा या भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक, तसेच 1948 मध्ये भारतीय नागरी सेवा (ICS) परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
उत्तर प्रदेश केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी भट्टाचार्य यांनी 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत अनेक पदकेही जिंकली. त्यानंतर निवृत्त होऊन त्या राजकारणात आल्या.
महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला कणखर IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी मुंबईच्या क्राइम ब्रँचच्या पहिल्या महिला प्रमुख होण्याचा मानही पटकावला.
‘लोक अधिकारी’ म्हणून प्रसिद्ध स्मिता सभरवाल या तेलंगणा केडर येथे मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
केरळमधील जनमैत्री सुरक्षा प्रकल्प राबविणाऱ्या संध्या या केरळ पोलिसांच्या अतिरिक्त महासंचालक आहेत.
भोपाळ येथील ईशा पंत यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू भारतीय पोलीस सेवा (IPS) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
तरुण वयातच अर्चना रामसुंदरम भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्या आणि त्या निमलष्करी दलाच्या प्रमुखपदी असलेल्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत.