Jagdish Patil
मुंबईसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
पहिल्यांदाच एकत्र येत युती केलेल्या ठाकरे बंधुंच्या उत्कर्ष पॅनेलचा या निवडणुकीत सुपडासाफ झाला आहे.
महायुतीचे सहकार समृद्धी आणि ठाकरेंच्या पॅनेलचीच या निवडणुकीत चर्चा होती. मात्र, निकालात शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांवर विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला .
या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलला 7 जागा मिळाल्या तर ठाकरेंना एकही जागा मिळवता आली नाही.
महायुती आणि ठाकरेंना वरचढ ठरलेले शशांक राव नेमके कोण आहेत. याबाबतची माहिती जाणून घेऊया.
शशांक राव हे अनेक वर्षांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिलेत. कामगार संघटनांसोबत सक्रिय राहत त्यांनी अनेक आंदोलनामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
आपर्यंतच्या बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्नांसाठी घेतलेल्या पुढाकारामुळेच त्यांना भरघोस यश मिळाल्याचं मानलं जात आहे.
कामगार संघटनेचे नेते शरद राव यांचे ते पुत्र असून मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख आहेत. त्यांनी BMC, बेस्ट, ऑटो, टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या संपात ते सक्रीय होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जनता दल युनाइटेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.