सरपंच ते मिरा-भाईंदरचे पहिले आमदार : राष्ट्रवादी ते शिंदेंची शिवसेना, गिल्बर्ट मेंडोसा यांचा राजकीय प्रवास

Jagdish Patil

गिल्बर्ट जॉन मेंडोसा

मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांचं काल सोमवारी (ता.18) निधन झालं.

Gilbert John Mendonca passes away

शोककळा

त्यांच्या निधनामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Gilbert John Mendonca passes away

सेठ

मेंडोसा यांना मिरा भाईंदरमध्ये 'सेठ' म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा राजकीय प्रवास सरपंच ते आमदार व्हाया नगरपरिषदेचे अध्यक्ष असा राहिला आहे.

Gilbert John Mendonca passes away

सरपंच

1978 मध्ये भाईंदरचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केल्यानंतर त्यांनी 1990 साली मिरा-भाईंदर नगरपरिषदेचे अध्यक्षपद भूषवलं.

Gilbert John Mendonca passes away

पहिले आमदार

त्यानंतर 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येत मिरा-भाईंदर मतदारसंघाचे पहिले आमदार बनले.

Gilbert John Mendonca passes away

लोकल

2011 मध्ये मीरा भाईंदरपासून लोकलची सुरुवात व्हावी म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं. तर 2014 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

Gilbert John Mendonca passes away

तुरुंगवास

तर 2016 मध्ये जमीन हडप प्रकरणी त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं.

Gilbert John Mendonca passes away

शिवसेना

2017 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश तेला तर शिवसेना फुटीनंतर नुकतंच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Gilbert John Mendonca passes away

कुटुंब

त्यांची पत्नी मिरा-भाईंदर महापालिकेच्या पहिल्या महापौर, तर मुलीने 2012–2017 या काळात महापौरपद भूषवलं आहे. तर त्यांचा मुलगाही नगरसेवक म्हणून कार्यरत होता.

Gilbert John Mendonca passes away | Sarkarnama

NEXT : चार्टर्ड अकाउंटंट ते UPSC टॉपर; हर्षिता गोयल यांची सक्सेस स्टोरी ठरेल तरुणांसाठी आदर्श!

Harshita Goyal IAS | Sarkarnama
क्लिक करा