Rashmi Mane
जागतिक आर्थिक परिस्थिती अनिश्चित असताना सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजनांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सध्या आकर्षक व्याजदरांचा लाभ मिळत आहे.
अनेक बँका आणि वित्तीय संस्था ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर (FD) अतिरिक्त व्याज देत आहेत. त्यामुळे नियमित उत्पन्नासोबत सुरक्षित गुंतवणुकीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे.
काही स्मॉल फायनान्स बँका आणि खासगी बँका FD वर 8 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देत आहेत. त्यामुळे कमी जोखमीमध्ये चांगला परतावा मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे.
सरकारी बँकांमधील FD योजनांवरही ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्क्यांहून अधिक व्याज मिळत आहे. सुरक्षितता आणि विश्वासार्हता पाहणाऱ्यांसाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.
देशातील सर्वात मोठी बँक SBI देखील ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक व्याजदर देत आहे. विविध कालावधीच्या ठेवींवर अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळू शकतो.
Senior Citizen Savings Scheme (SCSS) ही सध्या सर्वाधिक लोकप्रिय सरकारी योजना ठरत आहे. या योजनेत वार्षिक 8.2 टक्के व्याज मिळते आणि व्याजाची रक्कम प्रत्येक तिमाहीत खात्यात जमा होते.
Post Office Monthly Income Scheme (POMIS) मध्ये 7.4 टक्के व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूकदारांना दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळत असल्याने ती ज्येष्ठ नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे.
FD, SCSS आणि पोस्ट ऑफिस योजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेसह आकर्षक व्याजाचा लाभ मिळत आहे. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न हवे असल्यास या योजना उत्तम पर्याय ठरू शकतात.