Ganesh Sonawane
विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुटीचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर आता शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील 1 हजार 128 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या नव्या शैक्षणिक वर्षात एक निर्णय घेतला आहे.
हे सर्व अधिकारी 1 हजार 128 शाळा वर्षभरासाठी दत्तक घेणार आहेत. यात अगदी जिल्हाधिकारी सुद्दा सहभाग घेणार आहेत.
संबंधित अधिकारी वर्षभर वेळोवेळी शाळेला भेट देतील. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करतील.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल वाढविण्याबाबत उपाययोजना सुचवतील.
शाळेच्या भौतिक सुविधा, क्रीडा सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार यांसारख्या विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करतील.
धोकादायक बांधकाम, वापराअभावी, पाण्याअभावी बंद शौचालयासारख्या मूलभूत समस्या आढळल्यास, यंत्रणेस तत्काळ पावले उचलण्याबाबत सूचना करतील.