Vijaykumar Dudhale
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ भालके यांनी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली
पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांच्याकडून भगीरथ भालकेंचा 3,733 मतांनी पराभव झाला.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भालकेंच्या पॅनेलचा पराभव, अभिजीत पाटील यांची ‘विठ्ठल’वर सत्ता आली
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांच्या पंढरपूरमधील उमेदवारीचे संकेत दिले, त्यामुळे भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांपासून दुरावले.
पवारांपासून दुरावलेले भगीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ सरकोलीत आलं होतं.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाचे पानिपत झालं आणि भगीरथ भालके हेही पक्षापासून हळूहळू लांब राहू लागले.
लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना सक्रीय पाठिंबा दिला. पंढरपुरात चाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्य दिले.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूक असलेले भगीरथ भालके यांनी विठ्ठल परिवारातील युवराज पाटील, गणेश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांना सोबत घेऊन शरद पवार यांची बारामतीतील गोविंद बागेत भेट घेतली.