Vijaykumar Dudhale
भगीरथ भालके हे महाविकास आघाडीकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर आपण विधानसभेची निवडणूक लढविणार अशी घोषणा भगीरथ भालके यांनी आज पंढरपूरमधून केली आहे.
भारत भालके यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक भगीरथ भालके यांनी 2021मध्ये प्रथम लढवली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना एक लाख पाच हजार मते मिळाली होती.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कार्यक्रमात शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यानंतर भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेले होते.
भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्या ठिकाणीही त्यांचे मन रमले नाही.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीशी जुळवून घेत सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता.
भगीरथ भालके यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. पण महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.
'या' मुख्यमंत्र्यांना करावी लागली होती 'जेल'वारी