Rashmi Mane
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या संदर्भात तुरुंगात जावे लागले होते.
बिहारचे तीन वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले जगन्नाथ मिश्रा यांना 1997 मध्ये पहिल्यांदा तुरुंगात जावे लागले होते.
बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी जयललिता यांना पद सोडावे लागले.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना जेलमध्ये जावे लागले होते.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना 2000 मध्ये शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगात जावे लागले होते.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना मनी लाँड्रिंग आणि बेहिशोबी मालमत्ता या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला होता.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि TDP सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांना 9 सप्टेंबर रोजी कौशल्य विकास महामंडळाच्या निधीची अफरातफर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीच्या कारवाईमुळे अटक करण्यात आली होती. लष्कराशी संबंधित जमीन घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.