Ganesh Sonawane
नाशिकचे 'भगूर' हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे.
येथील नगरपालिकेवर २५ वर्षांपासून शिवसेनेच्या विजय करंजकर यांची सत्ता होती.
परंतु २०२५ च्या नगरपालिका निवडणुकीत भगूरमध्ये सत्तांतर झाले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे आता भगूरच्या नगराध्यक्षा झाल्या आहेत.
शिवसेनेच्या विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांचा प्रेरणा बलकवडे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला.
प्रेरणा बलकवडे यांचे माहेर पुण्याचे आहे. त्या लग्नानंतर नाशिकच्या भगूरमध्ये स्थायिक झाल्या.
प्रेरणा बलकवडे यांना निवडून आणण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना ठाकरे गट अशी तीन पक्षांची मोट आमदार सरोज अहिरे यांनी बांधली होती.
करंजकर यांची २५ वर्षांची सत्ता प्रेरणा बलकवडे यांनी उलथवून लावली आहे. बलकवडे यांना निवडून आणण्यात आमदार सरोज अहिरे यांची भूमिका महत्वाची राहिली.