Rashmi Mane
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सागर बंगल्यावर विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरच्या गणपतीची आरती करून बाप्पाला निरोप दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी लाडक्या गणरायाचे कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन केले. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा फडणवीस उपस्थित होत्या.
'बाप्पाची कृपा सदैव आमच्यावर राहील… याच विश्वासाने पुढच्या वर्षी नव्या उत्साहात, नव्या जोशात बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू', असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले.
गणरायाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले. परंतु हे गणपती विसर्जन एक वियोग नसून एक नवा आरंभ आहे. अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
दहा दिवस गणेशाची पुजा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.