Ganesh Thombare
काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मणिपूरमधून सुरुवात झाली.
राहुल गांधी 67 दिवसांत न्याय यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढणार.
राहुल गांधी या यात्रेतून 6 हजार 713 किलोमीटर अंतर पार करणार.
मल्लिकार्जुन खर्गेंनी मणिपूरमधून हिवरा झेंडा दाखवत या यात्रेला सुरुवात केली.
'भारत जोडो न्याय यात्रा' 20 मार्चला मुंबईमध्ये समाप्त होणार आहे.
राहुल गांधी काही अंतर बसमधून तर काही अंतर पायी प्रवास करणार आहे.
राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'चा हा दुसरा टप्पा आहे.
राहुल गांधींनी पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवास केला होता.
आता ही 'भारत जोडो न्याय यात्रा' 15 राज्यांमधून प्रवास करणार आहे.