Rashmi Mane
2 जानेवारी 1954 ला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. भारतातील नागरिकांचा असामान्य कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘भारतरत्न’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, उद्योग या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो .
त्याचसोबत भारताच्या 6 राष्ट्रपतींनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला भारतरत्न मिळालेल्या राष्ट्रपतींबद्दल सांगतो.
भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता हे विशेष. 1962 ते 1967 या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. 1962 मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राजेंद्र प्रसाद 1952 ते 1962 पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते.
भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांना 1963 मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना हा सन्मानही देण्यात आला होता. ते 13 मे 1967 ते 3 मे 1969 पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते. त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही.
मिसेल मॅन आणि नंतर भारताचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांना 1997 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 असा त्यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ होता.
1975 मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. व्ही.व्ही.गिरी यांनाही भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. 24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974 पर्यंत ते भारताचे राष्ट्रपती होते.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत ते भारताचे राष्ट्रपती होते.