सरकारनामा ब्यूरो
उत्तराखंडच्या 'या' आठ IPS अधिकाऱ्यांची केंद्रीय पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. चला पाहु कोण आहेत ते अधिकारी..
राजीव स्वरूप यांनी 22 दिवसांपूर्वीच IG गढवालची जबाबदारी स्वीकारली होती. पण आता त्यांची नियुक्ती सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) साठी करण्यात आली आहे.
वक्फ बोर्ड चे सीईओ असलेले मुख्तार मोहसीन यांची नेमणूक (सीआरपीएफ) म्हणून करण्यात आली.
IG नीरू गर्ग यांची ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआर अँड डी) या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
बीएसएफ या पदासाठी नियुक्ती करण्यात आलेले अरुण मोहन जोशी यांना चार महिन्यांपूर्वी आरएचे वाहतूक संचालक हे पद देण्यात आले होते.
DIG पदावर कार्यरत असलेल जन्मेजय खंडुरी यांची नियुक्ती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे.
सेंथिल अबुदाई कृष्णराज यांना सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)या पदावर कार्यभर स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
IG पदावर कार्यरत असलेले बरिंदरजीत सिंग यांना भारत-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
सभागर येथे उपमहानिरीक्षक या पदावर काम करत असलेल्या पी. रेणुका देवी यांची केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)मध्ये नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.