Rashmi Mane
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान मोदींची ट्विट करत घोषणा केली आहे. जाणून घेऊया त्यांची राजकीय कारकीर्द.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भाजपला शून्यातून शिखरावर नेण्यात अडवाणींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भाजपचे संस्थापक सदस्यांपैकी एक असणारे अडवाणी भारताचे 7 वे उपपंतप्रधान होते. देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक म्हणून अडवाणी यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
1980 आणि 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, अडवाणींनी भाजपला राष्ट्रीय राजकीय शक्ती बनविण्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित केले.
अडवाणी यांनी राम मंदिर आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाला एक नवीन दिशा आणि ऊर्जा दिली होती.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला.
1974 साली ते राज्यसभेवर निवडून गेले. 1977 साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले.
1998मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री होते.
1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या जवळ जवळ एक दशक त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष स्थान भूषवले आहे.