Rashmi Mane
AAP च्या खासदार स्वाती मालीवाल यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
आपच्या राज्यसभेत जाणाऱ्या पहिल्या महिला खासदार आहेत.
मालिवाल यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1984 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला.
एमिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जेएसएस अकादमी ऑफ टेक्निकल एज्युकेशनमधून आयटीमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.
वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी करिअर सोडले आणि 'परिवर्तन' या सामाजिक संस्थेत काम करू लागल्या.
2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या 23 सदस्यीय कोअर कमिटीचा त्या भाग बनल्या.
2015 मध्ये, मालीवाल या भारतातील महिला आयोगाच्या अध्यक्षा बनणाऱ्या सर्वात तरुण महिला होत्या.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली 1.7 लाखांहून अधिक प्रकरणे प्रभावीपणे हाताळली.