सरकारनामा ब्यूरो
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी गावतील सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
दोन वेळा आमदारकीनंतर पाच वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
सूर्यभान वहाडणे यांच्यानंतर लोकसभा सदस्य असताना पक्षप्रमुख पद भूषवणारे दानवे हे भाजपचे दुसरे नेते ठरले.
त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विस्तार वाढला.
महाराष्ट्रात भाजपचा पक्का पाया रचणारे पक्षाचे तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
शहरी केंद्रांमध्ये पक्षाचा मजबूत पाया रचण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला.
एकनिष्ठ भूमिकेमुळे भाजपच्या महत्त्वाच्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये रावसाहेब दानवे यांचेही नाव घेतले जाते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
R