Vijaykumar Dudhale
नाशिक जिल्ह्यात 13 सप्टेंबर 1978 रोजी जन्मलेल्या भारती पवार यांचे शिक्षण एमबीबीएसपर्यंत झाले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले ए. टी. पवार यांच्या त्या सूनबाई आहेत.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.
भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दिंडोरी मतदारसंघातून 2014 ची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
राष्ट्रवादीत योग्य सन्मान मिळत नसल्याने भारती पवार यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने दिंडोरीतून त्यांना लोकसभेचे तिकिट दिले आणि त्या खासदार म्हणून निवडूनही आल्या.
पहिल्यांदाच निवडून आलेल्या भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
मंत्रिमंडळ विस्तारावेळी प्रीतम मुंडे, हिना गावित, रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती. मात्र, भाजपने भारती पवार यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपने खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांना उतरविले होते. त्यातील १२ हून अधिक मंत्री विजयी झाले. त्यातील रेणुका सिंग यांच्याकडील आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्रीपद डॉ. भारती पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.
Next : किती शिकले आहेत रेवंथ रेड्डी?