Bharti Pawar BJP National Vice President : लोकसेभतील पराभवानंतर राष्ट्रीय राजकारणात पुन्हा संधी : कोण आहेत भारती पवार?

Pradeep Pendhare

भाजप संघटनेत फेरबदल

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, नितिन नवीन यांनी राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

भारती पवार यांना संधी

नाशिकमधील भाजपच्या माजी मंत्री भारती पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

NCPकडून BJP प्रवेश

डॉ. भारती पवार यांनी मार्च 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

खासदार अन् केंद्रात मंत्री

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदारकी, अन् पुढे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रिपद भूषवले.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

दिग्गज महिलांना टाकले मागे

मोदी मंत्रिमंडळाच्या 2021च्या विस्तारात प्रीतम मुंडे, हिना गावित, रक्षा खडसे या दिग्गज राजकीय महिलांना मागे टाकत, भारती पवार यांना संधी मिळाली.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

मोदींचा थेट पवारांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच खुद्द भारती पवार यांना दूरध्वनीवरून मंत्रिमंडळात निवड झाल्याचे सांगितले होते.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

2024च्या निवडणुकीत पराभव

भारती पवार यांचा लोकसभा 2024च्या निवडणुकीत अत्यंत नवखे राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांच्याकडून पराभव झाला.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

एटी पवार यांच्या स्नुषा

तब्बल 8 वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या भारती पवार स्नुषा आहेत.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

भारती पवारांची वाटचाल

जिल्हा परिषद सदस्य ते थेट भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदापर्यंतचा डॉ. भारती पवार यांचा हा प्रवास महाराष्ट्रातील महिला नेत्यांसाठी उंचावणारा ठरला आहे.

Bharti Pawar BJP | Sarkarnama

NEXT : भाजप सोडण्याची वेळ गोपीनाथ मुंडेंवर का आली होती?

येथे क्लिक करा :