Pradeep Pendhare
भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे विधान चर्चेत आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर बोलताना माजी मंत्री महादेव जानकर यांनी लोकनेते मुंडेंना भाजपचा जाच होता, असे म्हटलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांचा भाजपमधील राजकीय संघर्ष प्रामुख्याने प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर म्हणजेच 2006 आणि पक्षांतर्गत सूत्रे बदलत गेल्यावर तीव्र झाला.
प्रमोद महाजन शिवसेना आणि भाजप युतीच्या समन्वयाचे महत्त्वाचे दुवा होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकारणात मुंडे यांच्यासमोर पक्षांतर्गत नवीन आव्हाने उभी राहिली होती.
महाराष्ट्रात भाजप जनमाणसांपर्यंत नेणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काही अंतर्गत संघर्षाला अन् नाराजीना सामोरे जावे लागले.
नितीन गडकरी राष्ट्रीय राजकारणात आणि पक्षसंघटनेत प्रभावी झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्रात काही प्रमाणात डावलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
राज्य अन् राष्ट्रीय पातळीवरील निर्णयांमध्ये डावलले जात असल्याने 2011-12 च्या सुमारास गोपीनाथ मुंडे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या.
गोपीनाथ मुंडे यांचा महाराष्ट्रातील ओबीसी समाजात आणि तळागाळातील जनतेत असलेला मोठा प्रभाव लक्षात घेत, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना पुढे सांभाळून घेतले.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका निश्चित झाली अन् मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले. दुर्दैवाने शपथविधीच्या अवघ्या एका आठवड्यानंतर त्यांचे अपघाती निधन झाले.