Bhendval Prediction : भेंडवळची भविष्यवाणी कशी करतात; ती खरी ठरतात का? वाचा एका क्लिकवर!

Chetan Zadpe

वाघ घराण्याकडून भविष्यवाणी -

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येतील वाघ घराण्याचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांच्याकडून दरवर्षी भविष्यवाणी जाहीर करण्यात येते,

75 टक्के भविष्यवाणी खरी असल्याचा दावा -

आम्ही जाहीर करत असलेली भविष्यवाणी 70 ते 75 टक्के नेहमी खरे ठरणारे असते, असा दावा वाघ महाराजांनी केला आहे.

वैज्ञानिक नाही तर नैसर्गिक आधार -

आमच्या भाकितांना वैज्ञानिक आधार नसेल. मात्र नैसर्गिक आधार जरुर आहे. कारण निसर्गाच्या गोष्टींवरुन आम्ही भाकीत करत असतो, असं वाघ महाराज सांगतात.

सव्वातीनशे वर्षांची परंपरा -

साधरण 315 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी बुलडाण्यातल्या भेंडवळ इथे घटमांडणीची परंपरा सुरू केली. अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतात घटाची मांडणी करतात.

खड्डा खणतात -

शेतजमीनीत 1 फूट खोल खड्डा खणला जातो. खड्ड्यातून 4 ढेकळं बाहेर काढतात. हे ढेकळं म्हणजे 4 महिन्यांचं पावसाचं प्रतीक म्हणून मानलं जातं.

शेतकऱ्यांची श्रद्धा -

विदर्भातले अनेक शेतकरी या भेंडवळच्या या भविष्यवाणीवर श्रद्धा ठेवून आहेत. यानुसारच ते आपल्या शेतीचे नियोजन करतात.

नेवैद्य -

या 4 ढेकळांवर पाण्यानं मातची मडकी पाणी भरुन ठेवले जाते. या मडकींवर करंजी, पापड, कुरडई, वडा असे पदार्थ ठेवतात.

भाकीत कसे वर्तवतात -

रात्रभर या घटाला तसंच ठेवलं जातं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी घटात झालेल्या बदलांचं निरीक्षण करतात, त्यावरुन भाकीत वर्तवलं जातं.

NEXT : नरेंद्र दाभोलकर हत्या ते निकाल, 11 वर्षांत काय घडलं? वाचा सविस्तर...