Rashmi Mane
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगताच, भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये अक्षरा सिंह दिसल्यानं राजकारणात तर्कवितर्क सुरू झाले आहे.
काँग्रेस नेत्यांसोबतच्या फोटोमुळे सोशल मीडियावर अक्षरा सिंह यांच्या राजकीय प्रवेशाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर चर्चा रंगल्यानंतर अक्षरा सिंह यांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या बातमीवर खुलासा केला आहे.
"सध्या माझ्या राजकारणात येण्याची कोणतीही योजना नाही. मी माझ्या सध्याच्या कामात समाधानी आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
याआधी 2024 मध्ये हरियाणात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता. 2023 मध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य अभियानात सहभागी झाली होती. त्यावेळी वेळ आल्यास निवडणूक लढवेन, असेही म्हणाली होती.