लाखो फॉलोअर्स, पण एक चूक भोवली अन् द्यावा लागला सरकारी नोकरीचा राजीनामा!

Rajanand More

भुक्या गौतमी

सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स असलेल्या भुक्या गौतमी सध्या देशभरात चर्चेत आल्या आहेत. ही चर्चा त्यांच्या सोशल मीडियातील रील्स किंवा व्हिडिओमुळे नव्हे तर त्यांच्या सरकारी नोकरीच्या राजीनाम्यामुळे होत आहे.

Bhukya Gowthami (Instagram) | Sarkarnama

शिक्षिका

भुक्या गौतमी या तेलंगणातील एका सरकारी शालेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सोशल मीडियात त्या सातत्याने सक्रीय असायच्या. त्यामुळे त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांचे यू ट्यूब चॅनेलही आहे.

Bhukya Gowthami (Instagram) | Sarkarnama

राजीनामा

रील्स बनविणेच त्यांना आता महागात पडले आहे. असे काही घडले की त्यांना आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनीच सोशल मीडियातून ही माहिती दिली.

Bhukya Gowthami (Instagram) | Sarkarnama

नेमकं काय घडलं? गौतमी यांच्या एका व्हिडिओवर प्रशासनाने आक्षेप घेतला होता. या व्हिडिओतून खासगी शाळेची जाहिरातीबाजी होत असल्याचा ठपका ठेवत त्यांना जानेवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते.

Bhukya Gowthami (Instagram) | Sarkarnama

अधिकाऱ्यांकडून त्रास

निलंबन मागे घेतल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास देण्यात आला. सोशल मीडियातही प्रचंड ट्रोल करण्यात आल्यामुळे आपण नोकरीचा राजीनामा देत असल्याची माहिती गौतमी यांनी नुकतीच दिली.

Bhukya Gowthami (Instagram) | Sarkarnama

रडत-रडतच

निरोप ममिललागुडेम हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाच्या सहायक शिक्षिका म्हणून काम केलेल्या गौतमी यांनी रडत-रडतच नोकरीचा राजीनामा दिला. या व्यवस्थेत आपल्यासाठी कष्टाळू शिक्षकांची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Bhukya Gowthami (Instagram) | Sarkarnama

यू ट्यूब चॅनेल

गौतमी यांचे स्वतंत्र यू-ट्यूब चॅनेल असून त्यावरही लाखो सबस्क्रायबर्स आहेत. इंग्रजी भाषेशी संबंधित व्हिडिओ त्यांच्याकडून पोस्ट केले जातात. त्यांचे इंग्रजी संभाषणाशी संबंधित एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

Bhukya Gowthami (Instagram) | Sarkarnama

आदिवासी कुटुंब

आदिवासी कुटुंबात जन्म झालेल्या गौतमी यांनी बी.एड.चे शिक्षण पूर्ण करत शिक्षिका म्हणून काम सुरू केले होते. शाळेसोबतच त्या आपल्या विद्यार्थ्यांना खासगी शिकविणीद्वारे इंग्रजी विषय शिकवत होत्या.

Bhukya Gowthami (Instagram) | Sarkarnama

NEXT : कायदेशीर लढ्यानंतर अखेर दीड वर्षांसाठी मिळाली आमदारकी; कोण आहेत काँग्रेसच्या 'या' महिला नेत्या?

येथे क्लिक करा.