कायदेशीर लढ्यानंतर अखेर दीड वर्षांसाठी मिळाली आमदारकी; कोण आहेत काँग्रेसच्या 'या' महिला नेत्या?

Rajanand More

गायत्री शांतगौडा

गायत्री शांतगौडा या कर्नाटक काँग्रेसच्या नेत्या असून राज्याचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या विश्वासू मानल्या जातात. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे त्यांना नुकतीच आमदारकी मिळाली आहे.

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama

काय आहे निकाल?

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच कर्नाटक विधान परिषदेच्या चिक्कमगळूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या २०२१ च्या निवडणुकीचा निकाल रद्द करत हायकोर्टाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले आहे.

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama

निवडणुकीचा निकाल काय?

निवडणुकीत भाजपचे उमेदवार एम. के. प्रणेश हे अवघ्या सहा मतांनी निवडून आले होते. त्यांच्याविरोधात गायत्री शांतगौडा या काँग्रेसच्या उमेदवार होत्या.

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama

निकालाला आव्हान

शांतगौडा यांनी हायकोर्टात निवडणूक निकालाला आव्हान दिले होते. नामनिर्देशित सदस्यांनी निवडणुकीत मतदान केल्याचा तसेच प्रक्रियेत घोळ झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला होता. त्यावर हायकोर्टाने जानेवारी २०२५ मध्ये फेरमतमोजणीचे आदेश दिले होते.

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama

फेरमतमोजणीत विजयी

शांतगौडा या फेरमतमोजणी विजयी झाल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी झालेल्या या फेरमतमोजणीला प्रणेश यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama

याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टाने नुकतीच प्रणेश यांची याचिका फेटाळून लावत गायत्री शांतगौडा यांना विजयी घोषित करण्याचा मार्ग मोकळा केला.

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama

दीड वर्षांसाठी आमदार

गायत्री यांना आता पुढील दीड वर्षांसाठी विधानपरिषदेची आमदारकी मिळणार आहे. मोठी कायदेशीर लढाई दिल्यानंतर याच टर्ममध्ये निकाल लागल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama

भाजपला धक्का

कोर्टाच्या निकालामुळे भाजपला धक्का बसला असून विधान परिषदेतील आमदारांचा आकडा २७ पर्यंत खाली आला आहे. तर काँग्रेस आमदारांचा आकडा ४० वर गेला आहे.

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama

NEXT : वंदे मातरम् गायले नाही तर तुरुंगात जावे लागणार?

येथे क्लिक करा.