सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 फेब्रुवारीला प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत.
मोदी उद्या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जाणार आहेत.
मोदी सकाळी 10 वाजता प्रयागराज येथील बमरौली एयरपोर्टवर पोहचणार आहेत.
बमरौली एयरपोर्टवरून मोदी प्रयागराजच्या दिशेने रवाना होतील.
अरेल घाटाचा प्रवास बोटीतून करत पीएम मोदी संगमघाटावर येणार आहेत.
संगमघाटावर मोदींच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे.
दौऱ्यादरम्यान पीएम मोदी आखाडा, आचार्यवाडा, दांडीवाडा आणि खाकचौक येथील संताची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान आपला दौरा पूर्ण करून पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत.