परराष्ट्रमंत्र्यांच्या एका फोटोने वेधले लक्ष, 'ब्युटी क्वीन'चा असा आहे प्रवास...

Rajanand More

परराष्ट्रमंत्री चर्चेत

दिल्लीत पार पडलेल्या BRICS शिखर परिषदेनंतर नायजेरियाच्या परराष्ट्रमंत्री बियांका ओडुमेग्वु-ओजुकु अचानक चर्चेत आल्या आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील त्यांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Bianca Odumegwu Ojukwu | Sarkarnama

स्मितहास्य अन् स्टाईल

बियांका यांचे आकर्षक स्मितहास्य, साधेपणा अन् स्टाईलने भारतीय मीडिया तसेच सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या लूकची तुलना काहीजण मोनालिसाशी करत आहेत.

Bianca Odumegwu Ojukwu | Sarkarnama

ब्यूटी क्वीन

बियांका या केवळ राजकीय नेत्या नाहीत तर त्यांनी यापूर्वी ‘मिस इंटरकॉन्टिनेंटल’, ‘मोस्ट ब्युटीफुल गर्ल इन नायजेरिया’ हे प्रतिष्ठित किताबही पटकावले आहेत. तेव्हापासून त्यांना ब्युटी क्वीन म्हणून नायजेरियात ओळखले जाते.

Bianca Odumegwu Ojukwu | Sarkarnama

प्रसिध्द वकील

कायद्याचे शिक्षण घेतलेल्या बियांका या प्रसिध्द वकील आहेत. त्यामुळे त्यांच्या सौंदर्याप्रमाणेच बौध्दिक क्षमतेचीही सातत्याने चर्चा होते. त्यांची ही कारकीर्दही उल्लेखनीय आहे.

Bianca Odumegwu Ojukwu | Sarkarnama

राजकीय घराणे

नायजेरियाचे माजी उपराष्ट्रपती आणि माजी राज्यपाल सी. क्रिश्चियन ओनु यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत.

Bianca Odumegwu Ojukwu | Sarkarnama

ब्युटी क्वीन ते परराष्ट्रमंत्री

राजकारणात येण्याआधी त्यांनी स्पेनमध्ये नायजेरियाच्या राजदूत म्हणून काम केले. त्यानंतर त्यांच्याकडे देशाच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि पुढे परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी आली.

Bianca Odumegwu Ojukwu | Sarkarnama

प्रेरणादायी प्रवास

बियांका यांच्याकडे स्टाइल आयकॉन आणि एक सशक्त महिला म्हणून पाहिले जाते. ग्लॅमरच्या क्षेत्रात यश मिळवल्यानंतर आपल्या कौशल्याच्या जोरावर उच्च प्रशासकीय आणि राजनैतिक पदापर्यंत पोहोचता येते, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले.

Bianca Odumegwu Ojukwu | Sarkarnama

युवा, महिलांमध्ये क्रेझ

नायजेरियातील युवक आणि महिलांमध्ये बियांका यांची क्रेझ आहे. त्या नेहमीच पारंपरिक आफ्रिकी पेहरावावर भर देतात. त्यांचा साधेपणा आणि नम्रपणा येथील युवक आणि महिलांना भावतो.

Bianca Odumegwu Ojukwu | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्रात 18 वर्षे सेवा, IAS अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्तीनंतर भाजपकडून उमेदवारी

येथे क्लिक करा.