Rajanand More
माजी आयएएस अधिकारी देवाशिष शर्मा यांना आसाममधील नागांव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्याला ३ सप्टेंबर रोजी मंजूरी मिळाली. त्यानंतर त्यांनी ८ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपकडून ११ सप्टेंबरला शर्मा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे स्वेच्छानिवृत्तीमागे उमेदवारी हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले.
शर्मा हे आसाम राज्य सेवेत १९९२ मध्ये दाखल झाले होते. तेव्हापासून ३४ वर्षे त्यांनी विविध महत्वपूर्ण पदांवर काम केले. त्यांच्या कामांचे अनेकदा कौतुकही झाले.
मुंबईतील आसाम भवन येथे निवासी उपायुक्त म्हणून २००३ मध्ये नियुक्ती झाली. ते मे २०२१ पर्यंत म्हणजे १८ वर्षे मुंबईत होते. महाराष्ट्रात ते आसामचे प्रतिनिधित्व करत होते.
शर्मा यांना आयएएस म्हणून २०११ मध्ये बढती मिळाली. त्यानंतर मुंबई काही वर्षे सेवा केल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची गुवाहाटी महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली.
गुवाहाटीनंतर शर्मा यांची नागांवच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. या नियुक्तीमुळे त्यांच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट आला. सरकारी सेवेतून ते थेट राजकारणात आले.
नागांवच जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी असताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अनियमितता केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांची निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.