Traffic fine rules : बेदरकारपणे वाहन चालविल्यास खिसा होईल रिकामा; जेलची हवाही खावी लागेल, वाचा नवे नियम...

सरकारनामा ब्यूरो

ट्रॅफिक नियमाच्या दंडात वाढ

वाढत्या अपघाताचे प्रमाण पाहता, राज्यातील ट्रॅफिक नियमाच्या दंडात बदल करून ही रक्कम वाढवण्यात आली आहे. हे नियम 1 मार्च 2025 पासून लागू करण्यात आले आहेत.

New Traffic fine rules | sarkarnama

सीटबेल्टशिवाय गाडी चालवणे

वाहन चालकाने सीटबेल्टशिवाय फोर व्हीलर चालवल्यास 100 रुपयांचा दंड भरावा लागत होता, मात्र 2025 ला या नियमात बदल केला असून आता दंड 1 हजार रुपयांवर गेला आहे.

New Traffic fine rules | sarkarnama

ट्रिपल सीट

ट्रिपल सीट आणि विना हेल्मेटची दुचाकी चालवल्यास चालकास 100 रुपयांचा दंड भरावा लागत होता. आता या दंडाची रक्कम 1 हजार असून 3 महिन्यांसाठी वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

New Traffic fine rules | sarkarnama

अतिवेगाने वाहन चालवणे

धोकादायकपणे आणि अतिवेगाने वाहन चालवल्यास पूर्वी 500 रुपयांचा दंड होता. आता या दंडाची रक्कम बदलून 5000 रुपये केला आहे.

New Traffic fine rules | sarkarnama

विमा नसलेले वाहन चालवल्यास दंड

विमा नसलेले वाहन चालवल्यास पूर्वी चालकास 200 ते 400 इतका दंड भरावा लागत होता, आता हा दंड 2 हजार रुपये आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 4 हजार रुपये असेल. त्याचप्रमाणे 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.

New Traffic fine rules | sarkarnama

मोबाईल वापरल्यास दंड

वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास आणि वाहतूक सिग्नलचे उल्लंघन केल्यास 500 रुपयांच्या दंडाऐवजी 5 हजार रुपये दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.

sarkarnama

अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास दंड

अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास 2500 रुपये दंड भरावा लागत होता, मात्र आता त्यांच्या पालकांना 25 हजार रुपयांचा दंड किंवा 3 वर्षांचा तुरुंगवास, आणि 1 वर्षांसाठी वाहन नोंदणी रद्द केली जाणार आहे.

New Traffic fine rules | sarkarnama

लायसन्स नसल्यास

विनापरवाना वाहन चालवल्यास 500 रुपयांऐवजी 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तर मद्यप्राशन करुन वाहन चालवल्यास 1 हजार ते दीड हजार ऐवजी तब्बल 10 हजार रुपयांचा दंड आणि 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

New Traffic fine rules | sarkarnama

NEXT : बनवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची खैर नाही! मुख्यमंत्र्यांनीच दिला इशारा

येथे क्लिक करा...