Jagdish Patil
या कार्यक्रमादरम्यान मोदींनी भर पावसात शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
केंद्र सरकारने बागायती पिकांच्या हवामानास अनुकूल असणारे 32 पिके आणि फळांच्या 109 नवीन उच्च-उत्पादकता असणारे वाण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
त्यानुसार PM मोदींच्या हस्ते आज (11 ऑगस्ट) 109 वाणांचे लोकार्पण करण्यात आले.
यामध्ये 27 बागायती आणि 34 शेतीच्या पिकांचा समावेश आहे.
यावेळी मोदींनी स्वत:च्या हातात छत्री धरत शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचं पाहायला मिळालं.
शाश्वत शेती आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
यावेळी PM मोदींबरोबर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील उपस्थित होते.
शेतीसंदर्भातील विविध उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, तसंच त्यांच्यासाठी उद्योजकतेचे नवनवे मार्ग खुले व्हावेत यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे.