Aslam Shanedivan
काहीच दिवसांपूर्वी बीडमध्ये रेल्वे धावली. ज्यामुळे त्यांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
आता बीडकरांसाठी आणखीन मोठी आनंदाची बातमी असून आता येथे विमानही लँड होणार आहे.
प्रस्तावित बीडच्या विमानतळासाठी प्रशासनाने कामखेडा परिसरात जागा निश्चित केली आहे.
तर या जागेची एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MADC) अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे
या प्रकल्पासाठी एकूण 170 हेक्टर जमीन लागणार असून ज्यापैकी 80 हेक्टर जमीन सरकारकडे उपलब्ध आहे. उर्वरित जमीन भूसंपादनाद्वारे घेतली जाणार आहे.
बीड विमानतळ पूर्ण झाल्यानंतर येथे सुविधा, रोजगार आणि आर्थिक प्रगती याची नवी दालनं उघडणार आहेत, ज्यामुळे शहराचे महत्त्व देशाच्या हवाई नकाशावर वाढेल.
विमानतळ सुरू झाल्यानंतर बीडचा संपर्क मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांशी थेट हवाई मार्गाने होईल. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून पर्यटन आणि उद्योगक्षेत्राला चालना मिळेल.