Pradeep Pendhare
महाराष्ट्रातील नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापासून आपत्कालीन परिस्थितीत एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होत आहे.
ही एअर ॲम्ब्युलन्स सेवा अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा असेल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांचे प्राण वाचवणे सुलभ होईल.
अत्याधुनिक रुग्णवाहिकांसाठी सुमीत एसएसजी बीव्हीजी या संस्थेसोबत 10 वर्षांचा करार करण्यात आला आहे.
एअर ॲम्ब्युलन्सव्यतिरिक्त पाच समुद्री बोटीदेखील रुग्णवाहिका सेवेत समाविष्ट केल्या जाणार आहेत.
यासोबतच राज्यात नव्या स्वरूपातील 200 आधुनिक रुग्णवाहिका रस्त्यावर धावतील.
नव्या रुग्णवाहिकांमध्ये मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज सिस्टीम असेल.
वाहनांमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन, संगणकीकृत डिस्पॅच प्रणाली, वाहन ट्रॅकिंग आणि रुग्ण आगमनाची पूर्वमाहिती देणारी यंत्रणा बसवली जाईल.
फाइव्ह-जी तंत्रज्ञानावर आधारित या रुग्णवाहिकांमध्ये व्हेंटिलेटरसह 25हून अधिक वैद्यकीय उपकरणे असतील.