Rashmi Mane
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता.
Ambit इकॉनॉमी रिपोर्टनुसार, 8वा वेतन आयोग लागू झाल्यास 30 ते 34% पगारवाढ होऊ शकते.
या निर्णयाचा 1.12 कोटी केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना थेट फायदा होईल.
GDP वाढत असली तरी वेतन आयोगाचा सरकारच्या खर्चावर 15.5% परिणाम होण्याची शक्यता.
पगारवाढीचं प्रमाण हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे.
बेसिक सॅलरी 50,000 असल्यास 1.82 फिटमेंट फॅक्टर नुसार – 91,000, 2.15 फिटमेंट फॅक्टर नुसार – 1,07,500 इतका परिणाम सॅलरीवर होणार आहे.
फक्त पगार नाही तर DA (महागाई भत्ता) व अन्य भत्त्यांतही वाढ होणार आहे.
पेन्शनधारकांसाठी देखील चांगली बातमी पेन्शनमध्येही वाढ होऊ शकते.