Ganesh Sonawane
बुरखा किंवा पडदा घातलेल्या महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था जाहीर केली.
आयोगाने सांगितले की, बुरखा घातलेल्या महिलांना मतदानासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
महिला मतदारांची ओळख तपासणी महिला मतदान अधिकारी किंवा सहाय्यकांच्या उपस्थितीत केली जाईल.
ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीयतेचे आणि सन्मानाचे पालन करत पार पाडली जाणार आहे.
राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर अंगणवाडी सेविका ओळख पडताळणीसाठी तैनात राहतील. ज्या बुरखा घातलेल्या महिलांची ओळख तपासण्यात मदत करतील.
एकूण 90,712 अंगणवाडी सेविका निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केल्या जाणार आहेत.
बुरखा घातलेल्या महिलांची ओळख निश्चित करण्याची विनंती बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी आयोगाला केली होती.
ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, सर्व मतदान केंद्रांनी आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.