Ganesh Sonawane
यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी मागणी केली होती पण तो त्यांना मिळाला नाही.
जगभरात शांती आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांनाही हा पुरस्कार दिला गेला नाही.
महात्मा गांधींना या पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळाले, पण प्रत्येकवेळी त्यांना वंचित ठेवण्यात आले.
गांधींना नोबेल पुरस्कार न मिळण्यामागे नोबेल कमिटीमधील काही सदस्यांची भिन्न विचारसरणी कारणीभूत होती.
गांधींचे आंदोलन अहिंसक असले, तरी त्याचे परिणाम काही वेळा हिंसा आणि अस्थिरतेच्या रूपात दिसले असे काही सदस्यांचे म्हणणे होते.
याशिवाय काही सदस्यांचे मत होते की गांधींनी फक्त भारतीयांच्या हक्कांसाठीच लढा दिला, जगातील इतर अत्याचारांविरुद्ध त्यांनी पुरेशी भूमिका घेतली नाही.
या सर्व तर्कांच्या आधारे प्रत्येक वेळी गांधींचे नाव वगळण्यात आले, आणि त्यांना नोबेल शांतता पुरस्कार कधीच मिळाला नाही.