Rajanand More
बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार रजनीश यादव यांची चांगलीच चर्चा होत आहे.
कलहगाव मतदारसंघातील उमेदवार रजनीश यांचे वडील संजय प्रसाद यादव हे झारखंड सरकारमध्ये मंत्री आहेत. ते राजदचे कोटा मतदारसंघातील आमदार आहेत.
रजनीश हे केवळ 26 वर्षांचे असून ते कोट्यधीश आहेत. कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांच्या नावावर त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
रजनीश यांनी लंडनमधील यूनिव्हर्सिटी ऑफ ग्रीन विच लंडन येथून एमबीएही पदवी संपादन केली. 2022 भारतात आल्यानंतर त्यांनी 2024 मध्ये वडिलांचा प्रचार केला होता.
एकही कार नावावर नसली तरी रजनीश यांच्याकडे 3 लाख 15 हजार रुपयांची दुचाकी आहे. तसेच 12 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही आहेत.
रजनीश यांच्या नावावर तब्बल 28 कोटी 16 लाख रुपयांची जमीन आहे. त्यामध्ये शेतजमिनीसह कमर्शियल जागेचाही समावेश आहे.
कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या रजनीश यांच्यावर 87 लाखांचे कर्जही आहे. शेती, पशुपालन आणि व्यापरातून त्यांची कमाई होत असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
रजनीश यांचे वडील झारखंडमध्ये मंत्री आहे. त्यामुळे आता त्यांचा मुलगा बिहारमध्ये आमदार म्हणून निवडून आल्यास यादव कुटुंबाचे एकाचवेळी दोन राज्यांत राजकारण सुरू राहणार आहे.