Rajanand More
कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
राज्यसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सला तीन जागा तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला.
भाजपचे उमेदवार सतपाल शर्मा हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. भाजपचे तीन उमेदवार रिंगणात होते. शर्मा यांच्या विजयाने भाजपचे कमळ फुलले.
सतपाल शर्मा यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. भाजपकडे केवळ 28 आमदार असताना शर्मा यांना 32 मते मिळाली. त्यामुळे निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा.
सतपाल शर्मा हे जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात यापूर्वी मंत्री म्हणून काम केले आहेत.
शर्मा हे जम्मू पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहे. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष बनले होते.
शर्मा यांचे राजकीय करिअर मोठे राहिले आहे. ते पेशाने सीए आहेत. 1986 मध्ये ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाचे फेलो बनले होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागले होते. आता शर्मा हे राज्यसभेत भाजपचे प्रतिनिधित्व करतील.