Rajanand More
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एनडीएला मोठा झटका बसला आहे.
एनडीएतील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) च्या उमेदवार सीमा सिंह यांनी छपरा जिल्ह्यातील मढौरा मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता.
उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्याने सीमा यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला आहे.
सीमा सिंह यांचा अर्ज बाद झाल्याने एनडीए सह लोक जनशक्ती पक्षाला झटका बसला आहे. आता या मतदारसंघात एनडीएचा अधिकृत उमेदवार नसेल.
सीमा या भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आयटम गर्ल, डान्सिंग क्वीन म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
चिराग पासवान यांच्या पक्षाच्या युवा विंगच्या त्या महासचिवही आहेत. पण निवडणुकीच्या राजकारणात पाऊल ठेवण्याआधीच त्यांची विकेट उडाली आहे.
मागील काही महिन्यांपासून त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. लोकांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका सुरू होता. पण आता तयारीवर पाणी पडले आहे.
सीमा या मुळच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आहे. पण त्यांना बिहारमध्ये खूप प्रसिध्दी मिळाली. त्यांनी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये आयटम डान्स केला आहे.