Rashmi Mane
भारतामध्ये क्रिकेट आणि राजकारण यांचा संबंध नेहमीच विशेष राहिला आहे. मात्र जेव्हा एखाद्या क्रिकेटरची पत्नी राजकारणात आपली छाप सोडते, तेव्हा विषय अधिकच चर्चेचा ठरतो.
मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण घेतलेली रिवाबा जडेजा यांची कहाणी खऱ्या अर्थाने एखाद्या परिकथेइतकीच अनोखी आहे.
बहुतेक लोक इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर या क्षेत्रात करिअर घडवतात, मात्र रिवाबा यांच्या आयुष्यात वेगळेच वळणं घेतलं आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला आणि या क्षेत्रात त्यांनी प्रभावी कामगिरी केली. भाजपाने त्यांना आपले उमेदवार म्हणून निवडले आणि पहिल्याच प्रयत्नात त्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी ठरल्या.
त्यांच्या या कामगिरीमुळे गुजरातच्या राज्य मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. विवाहपूर्वी रिवाबा यांचे नाव रीवा सोलंकी होते.
त्यांनी 2016 मध्ये भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्यासोबत विवाह केला.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत जामनगर नॉर्थमधून त्यांनी आम आदमी पार्टीच्या कर्षणभाई कर्मूर यांना 50,000 पेक्षा जास्त मतांनी पराजित केले.