Pradeep Pendhare
बिहारमध्ये एक कोटी 30 लाखहून अधिक महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये सरकारकडून टाकण्यात आले.
100 हून अधिक बंडखोरांना अमित शहा यांनी भेट घेत शांत केलं. परिणामी एनडीएमधील बंडखोरी थांबली.
महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये लाडक्या बहिणी 'एनडीए'च्या बाजूने राहिल्या.
विकासाचा नारा बिहारच्या जातीय समीकरणावर भारी पडला. एनडीएकडून लोकप्रिय योजनांची घोषणा.
'आरजेडी'ला मतदान म्हणजे, पुन्हा जंगलराज येणार यावर 'एनडीए'च्या प्रचाराचा भर राहिला.
नितीशकुमार यांनी महिला मतदारांमध्ये प्रचारांवर भर ठेवला. परिणामी महिलांचे निवडणुकीत 10 टक्के मतदान वाढलं.
'एनडीए'चा बिहारमध्ये नियोजनपूर्वक प्रचार करताना पीएम नरेंद्र मोदी प्रमुख चेहरा ठरले. प्रचाराची बूथपर्यंत बांधणी केली होती.
महागठबंधनमध्ये जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत कायम राहिला. काँग्रेसने घोळ घातल्याचा विरोधकांचा सूर आहे.
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी बिहारच्या प्रचारात सातत्य ठेवले कमी पडल्याचे विश्लेषकांनी निरीक्षण नोंदवलं आहे.
काँग्रेसने तेजस्वी यादव यांच्यावर महागठबंधनवर प्रचाराची सर्वाधिक धुरा सोपवली.