Pradeep Pendhare
बिहार निवडणुकीत पुरूष 4 कोटी 7 लाख 63 हजार 542, तर महिला 3 कोटी 72 लाख 57 हजार 477 मतदार आहेत.
एकूण 8 कोटी मतदारांमध्ये 60 टक्के युवा मतदार असून, ते रोजगारासाठी करत असलेल्या स्थलांतर मुद्दा प्रचारात तापला आहे.
18 ते 39 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 4 कोटींच्या जवळपास असून, 18 ते 45 वयोगटातील युवा मतदारांची संख्या सुमारे 5 कोटी आहे.
नितीश सरकारने जातीय जनगणना केली. त्यावेळी दरवर्षी 45 लाखांहून अधिक लोक नोकरी आणि रोजगारासाठी बिहारमधून स्थलांतर करत असल्याची माहिती समोर आली.
5 लाखांहून अधिक युवक शिक्षणासाठी स्थलांतर करतात. विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्थलांतर थांबवण्याचे आश्वासन देत आहेत.
नितीश कुमार यांनी सध्याच्या सरकारने 10 लाखांहून अधिक नोकऱ्या दिल्या असून, पुढील 5 वर्षांत एक कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर तीन वर्षांपासून बिहारचा दौरा करत असून, त्यांनी स्थलांतराला एक मोठा मुद्दा बनवला आहे.
तेजस्वी यादव यांनी बिहार प्रशासनातील रिक्त जागा सरकार येताच भरणार असल्याची घोषणा केली आहे.