Rajanand More
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निशांत कुमार हे पुत्र आहेत. मात्र, सध्या राजकारणापासून कोसो दूर आहेत.
निशांत कुमार फारसे सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नाही. निवडणूक प्रचारातही सक्रीय नसतात.
राजकारणात येणार नसल्याचे निशांत यांनी नुकतेच स्पष्ट केले. ते अध्यात्माशी जोडले गेले आहेत.
नितीश कुमार यांचे कुटुंबही राजकारणापासून दूर आहे. त्यांनी घराणेशाहीला राजकारणात थारा दिलेला नाही.
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी 18 वर्षे कार्यभार सांभाळला आहे. पण त्यांचे कुटुंब लाइमलाइटपासून दूरच राहिले.
नितीश कुमार हे संयुक्त जनता दलाचे प्रमुख आहेत. त्यांनी वयाची सत्तरी पार केली आहे. त्यामुळे त्यांच्याजागी पक्षाची धुरा कोण सांभाळणार, अशा चर्चा सातत्याने होत असतात.
निशांत कुमार यांनी राजकारणात सक्रीय व्हावे, असा आग्रह नातेवाईकांकडून केला जात आहे.
नितीश कुमार यांच्यासाठी 2025 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे निशांत कुमार या निवडणुकीत तरी सक्रीय होणार का, असा प्रश्न आहे.