Akshay Sabale
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल जाणून घेणार आहेत...
दक्षिणेत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या भाजपसाठी महत्त्वाचे नेते म्हणून राधाकृष्णन यांचे नाव आघाडीवर आहे. केरळचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
2012 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यावरील हल्लेखोरांना मोकाट सोडले गेल्याबद्दल त्यांनी मेट्टुपालयममध्ये निदर्शने केली होती. त्याबद्दल त्यांना अटक झाली होती.
1998 मध्ये कोइमतूरमधील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसभा लढवून दणदणीत विजय मिळविला होता.
2014 तसेच 2019 मध्ये त्यांनी लोकसभेसाठी कडवी झुंज दिली होती. अशा कामगिरीबद्दल त्यांना ‘तमिळनाडूचे मोदी’ असे संबोधले जाते
राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत. रमेश बैस यांची गेल्या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती.
त्याआधी भगतसिंह कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2019 ते 17 फेब्रुवारी 2023 अशा सुमारे साडे तीन वर्षांच्या कालावधीत हे पद भूषविले.
त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे एकूण 24वे राज्यपाल ठरले आहेत.