Vijaykumar Dudhale
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार हे एका कार्यक्रमाला गेले होते, त्या वेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव दीपक कुमार हेही सोबत होते.
त्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना मुख्यमंत्री नितीशकुमार हे शेजारी उभे असलेले बिहारचे मुख्य सचिव दीपक कुमार यांच्याशी बोलत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार बोलत असताना दीपक कुमार मात्र काहीसे अस्वस्थ दिसत आहेत.
राष्ट्रगीताचा अवमान हा कायद्याने गुन्हा आहे, तो गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.
राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा १९७१ नुसार संबंधित व्यक्तीला दंडात्मक तसेच तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होते किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
देशातील सर्व नागरिकांनी राष्ट्रगीताचा सन्मान करणे बंधनकारक आहे, असे संविधानाच्या कलम ५१ अ मध्ये म्हटले आहे.
राष्ट्रगीत चालू असताना त्याचा अवमान करणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय सन्मान कायदा 1971 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.