Deepak Kulkarni
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे.
आपल्याला परदेशातून भारतात किती पैसा आला आणि सर्वाधिक पैसा भारतात कोणत्या देशातून आला यावर याविषयी उत्सुकता असते.
रिझर्व बँक ऑफ इंडिया ( RBI) ने आपल्या अहवालात या संदर्भातली माहिती समोर आली आहे.
एकूण 118.7 अब्ज डॉलर भारतात 2023-24 या वर्षात आले आहेत.
भारतात येणाऱ्या एकूण विदेशी पैशांपैकी 38 टक्के रक्कम या आखाती देशांमधून आली आहे.
संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान बहरीन,सौदी अरेबिया या आखाती राष्ट्रांचा भारताला पैसे पाठवण्यात पहिला क्रमांक लागतो.
आखाती देशांच्या बाबतीत UAE पहिल्या क्रमांकावर आहे. पण, जगभरातील देशांचा विचार करता सर्वाधिक पैसा हा अमेरिकेतून येतो.
2023-24 मध्ये भारतात पाठवल्या जाणाऱ्या एकूण रेमिटन्समध्ये सर्वाधिक योगदान अमेरिकेचं 27.7 टक्के इतके होतं.