Sunil Balasaheb Dhumal
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची संपत्ती घोषित करण्यात आली आहे.
यात नितीश कुमारांची एकूण संपत्ती 1.64 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू तेज प्रताप यादव यांची एकत्रित एकूण मालमत्ता सुमारे 7.68 कोटी रुपये आहे.
यादवांची सपंत्ती नितीश कुमार यांच्या तब्बल सहा पट जास्त आहे.
नितीश कुमार यांच्याकडे 16.84 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची स्थावर मालमत्ता 1.48 कोटी रुपये आहे.
तेजस्वी यादव यांची जंगम मालमत्ता 1.11 कोटी रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता 3 कोटी रुपये आहे.
मंत्री तेज प्रताप यादव यांनी 1.79 कोटी रुपयांची जंगम, तर 1.78 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.