Aslam Shanedivan
प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांच्या हत्येनंतर 72 तासांच्या आत मुख्य शूटर उमेशला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आयपीएस कुंदन कृष्णन यांची चर्चा झाली होती.
यानंतर त्यांनी एका पत्रकार परिषदेत बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीसाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरले होते. ज्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे.
बेरोजगारी आणि मोकळ्या वेळेमुळे तरुण पैशाच्या हव्यासापोटी सुपारी हत्यासारख्या गुन्ह्यांकडे आकर्षित होत असल्याचेही ते म्हणाले होते.
त्यावरून आता बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले असून तेजस्वी यादव यांनी, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नितीश कुमार यांना जबाबदार धरले आहे
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी कृष्णन यांच्या त्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. तर शेतकरी गुन्हेगार नसून ते अन्नदाता असल्याचे सुनावले आहे.
कुंदन कृष्णन हे बिहारमधील आयपीएस अधिकारी असून ते 1994 च्या बॅचचे बिहार कॅडरचे अधिकारी आहेत
बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असलेले कुंदन कृष्णन हे त्यांच्या कडक पोलिसिंग आणि गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत.