Ganesh Sonawane
राज्यातील तब्बल 72 अधिकारी, माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे.
मात्र हे हनी ट्रॅप म्हणजे नक्की काय? त्यात हे अधिकारी, राजकीय नते नेमके कसे अडकले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हनीट्रॅप हा एखादी गुप्त माहिती बाहेर काढण्याचा मार्ग समजला जातो. एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात.
यात मोठ्या पदावरील व्यक्तीला टार्गेत केले जाते. या शिवाय मोठ्या व्यक्तीच्या जवळच्या माणसाला ही या ट्रॅपमध्ये अडकवले जावू शकते.
खास करून या मिशनसाठी सुंदर महिलांचा वापर अधिक होतो. या प्रकारात एखाद्या व्यक्तीशी प्रेम किंवा लैंगिक संबंध निर्माण केले जातात. त्यातून संबधीत व्यक्तीकडून गोपनिय माहिती काढून घेतली जाते.
पुढे या माहितीचा वापर राजकीय, आर्थिक आणि हेरगिरीच्या उद्देशांसाठी केला जातो. राजकारण, कॉर्पोरेट, फॅशन, मनोरंजन, गुप्तचर यंत्रणा, लष्कर, खेळ इत्यादी सगळ्याच क्षेत्रांत हनी ट्रॅप चालतं.
यासाठी सुंदर महिलांना विशेष ट्रेनिंग दिले जाते. टार्गेट कोण आहे त्याची इंत्यभूत माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवली जाते.
हनीट्रॅममध्ये अडकल्यानंतर संबधित व्यक्तीसोबत शरिरसंबध ठेवताना त्याचे खाजगी फोटो किंवा व्हिडीओ काढले जातात. त्या द्वारे पुढे त्याला ब्लॅकमेल केलं जातं.
यातून गोपनिय माहिती तर मिळवली जातेच शिवाय पैसेही उकळले जातात.