Pradeep Pendhare
बिहार राज्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची स्थापना झाली असून, यात राष्ट्रीय लोक मोर्चाचे दीपक प्रकाश चर्चेत आहेत.
निवडणूक न लढवता दीपक प्रकाश यांना नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.Bihar election
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री दीपक प्रकाश यांचे अभिनंदन केले असून, यामागील घराणेशाहीचं राजकारण चर्चेत आलं आहे.
दीपक प्रकाश हे यांचे वडील राष्ट्रीय लोक मोर्चाचे उपेंद्र कुशावाहा हे राज्यसभेवर खासदार, तर आई स्नेहलता आमदार आहे.
बिहार निवडणुकीतील जागा वाटपावेळी उपेंद्र कुशावाहांची नाराजी अमित शहा यांनी विधानपरिषदेची जागा देत दूर केली.
उपेंद्र कुशावाहा यांनी राजकीय फायदा उठवत, पत्नीऐवजी मुलगा दीपक प्रकाश याला मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेण्यास पुढं केलं.
दीपक प्रकाश याला विधानपरिषद किंवा विधानसभेची निवडणूक पुढील सहा महिन्यात जिंकावी लागणार आहे.
दीपक प्रकाश उच्चशिक्षित असून, त्यांनी काॅम्प्युटर सायन्समधून अभियांत्रिक शिक्षण घेतलेले आहे.
उपेंद्र कुशावाहा यांनी 20 फेब्रुवारी 2023 मध्ये पक्षाची स्थापना करून परिवाराला राजकारणात स्थिर केलं असून, विधानसभेत चार जागा जिंकल्या आहेत.