Rajanand More
नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य २६ आमदारांनीही मंत्रिपद व गोपनीयतेची शपथ घेतली.
मंत्रिमंडळामध्ये भाजपच्या आमदार श्रेयसी सिंह यांनाही स्थान मिळाले आहे. केवळ ३४ वर्षांच्या असलेल्या श्रेयसी यांच्यासाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
श्रेयसी यांना बिहारमध्ये ‘गोल्डन गर्ल’ म्हणून ओळखले जाते. केवळ त्यांचा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण बिहार आणि देशातही त्या प्रसिध्द आहेत. यामागचे कारणही तसेच आहे.
श्रेयसी या नेमबाजीतील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. राष्ट्रकुल स्पधेत त्यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहेत. त्याचप्रमाणे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल यांना केंद्र सरकारकडून अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. खेळात प्रसिध्दी मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
श्रेयसी यांनी जमुई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजय मिळवला आहे. त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपदाची सधी मिळाली आहे.
माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांच्या त्या कन्या आहेत. त्यांची आई पुतुल कुमार या माजी खासदार आहेत. त्यामुळे श्रेयसी यांना राजकारणात घरातूनच मोठे पाठबळ मिळाले आहे.
श्रेयसी यांचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून झाले आहे. तेजस्वी यादव यांच्या त्या क्लासमेट असल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. श्रेयसी यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.